S R DALVI (I) FOUNDATION

एस आर दळवी (आय) फाउंडेशन ही संस्था श्रीमती सीता दळवी यांनी स्थापन केली आहे. 'शिक्षक' हे भावी पिढीचे शिल्पकार आहेत व तेच आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात, आणि म्हणून अशी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी ही फाउंडेशन सीता रामचंद्र दळवी आणि त्यांचे पती रामचंद्र दळवी यांचा द्वारे सुरु करण्यात आली आहे.


२०२१ मध्ये आमच्या फाउंडेशन ने कोव्हीड च्या काळात ज्या शिक्षकांनी मोलाची कामगिरी केली होती अशा १२ शिक्षकांचा 'महाशिक्षक पुरस्कार २०२१' देऊन त्यांचा सन्मान केला होता. हा पुरस्कार देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची उपस्थिती लाभली होती.


आता साल २०२२ साठी शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजप्रति ते करत असलेल्या कामगिरीसाठी 'उत्कर्ष पुरस्कार २०२२' आम्ही घेऊन येत आहोत.

APPLY HERE

To Participate in Utkarsh Award

पुरस्कार देण्याचे कारण

आजचे विद्यार्थी हे उद्याचा समाज घडवणार आहेत आणि विद्यार्थ्यांना घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते. विद्यार्थ्यांना उद्याचे सुजाण नागरिक बनवण्यासाठी शिक्षक जे काही करतात त्याची परत फेड आपण कधीच करू शकत नाही मात्र फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांचा सन्मान आणि कौतुक नक्कीच करू शकतो. या पुरस्काराचा मुख्य उद्देश्य शिक्षकांचा सन्मान करणे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उत्कृष्ट शिक्षक शोधणे हा आहे.

नियम व अटी

  • १. शिक्षकांनी रजिस्ट्रेशन एकदाच करावे.
  • २. सहभाग घेतलेले शिक्षक हे सांगितलेल्या पात्रतेत बसणारे असावेत.
  • ३. शिक्षकांनी लिहिलेला निबंध एकदाच पोस्ट करावा.
  • ४. लिहिलेला निबंध कोणत्याही साइट अथवा लेखातून कॉपी केलेला नसावा.

पुरस्कार पात्रता :

आदर्श शिक्षक अवॉर्ड :

३ किंवा ३ वर्षांपेक्षा जास्त काळ शैक्षणिक अनुभव असणारे शिक्षक या पुरस्कारासाठी पात्र असतील.

रायझिंग स्टार अवॉर्ड :

ज्या शिक्षकाने ५ किंवा ५ वर्षांपेक्षा कमी काळ अध्यापन केले आहे, असे शिक्षक ज्यांनी मुलांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे आणि आपल्या कौशल्याने आणि शिक्षणाने शाळेच्या आणि शिक्षण पद्धतीच्या वाढीसाठी तितकेच सकारात्मक योगदान दिले आहे, असे शिक्षक रायझिंग स्टार अवॉर्ड साठी पात्र असतील.

जीवनगौरव पुरस्कार :

ज्या शिक्षकांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी, अध्यापनासाठी वाहून घेतले आहे आणि समाजाला आधार देण्यासाठी पुढे जाऊन सेवानिवृत्तीकडे वाटचाल केली आहे, अशा शिक्षकांचा त्यांच्या शिक्षण आणि समाजासाठी समर्पित सेवेबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येईल.

आदर्श शाळा पुरस्कार :

ज्या शाळेने अनुकरणीय कामगिरी आणि नवकल्पना दाखवल्या आहेत त्यांना आदर्श शाळा म्हणून सन्मानित केले जाईल.

पुरस्कार:
प्रत्येक जिल्ह्यात ८ पुरस्कार जाहीर होतील .

आदर्श शिक्षक :

प्रथम विजेता - टॅब्लेट

द्वितीय विजेता - मोबाईल फोन

तृतीय विजेता - ब्लूटूथ इयरफोन

रायझिंग स्टार :

प्रथम आणि द्वितीय विजेते : कौतुक पत्र आणि स्मृतिचिन्हप्रथम आणि द्वितीय विजेते : कौतुक पत्र आणि स्मृतिचिन्ह

जीवनगौरव पुरस्कार :

प्रथम आणि द्वितीय विजेते : शाल, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन सत्कार.

आदर्श शाळा पुरस्कार :

शिल्डसह कौतुक पत्र.

निवड प्रक्रिया :

शिक्षण, कला, विज्ञान, सामाजिक कार्य इत्यादी विविध क्षेत्रांतील ५ ज्युरी सदस्यांचे मंडळ वरील निबंधांच्या आधारे शिक्षकांची निवड करतील.

* पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व शिक्षकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

*पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना स्मृतिचिन्ह देण्यात येईल.